गणेशोत्सव 2024

Pune : पुणे शहरात गणेश विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज

Published by : Siddhi Naringrekar

दहा दिवसांच्या या भक्तीमय उत्साहानंतर गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन केले जाते. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' नामघोषात बाप्पाला आज निरोप दिला जाईल. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे.

मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून पुणे शहरात देखिल गणेश विसर्जनासाठी पुणे पोलीस सज्ज झालेलं पाहायला मिळत आहेत. पुणे पोलिसांचा शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यासोबतच पुणे शहरात 126 नॉईस लेवल मीटर तैनात असणार असल्याची माहिती मिळत आहे. कोणत्याही मंडळाने श्री गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान ध्वनी संबंधात देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करू नये.

जे कोणते मंडळ नियमांचे उल्लंघन करतील त्यावर कारवाई करण्यासाठी नॉईज लेवल मीटर घेऊन 126 टीम तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश; मोहित कंबोज यांचं ट्विट, म्हणाले...

Ambadas Danve : अंबादास दानवे यांचे राज्यपालांना पत्र; पत्रात काय?

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना